
नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. कारण तब्बल 24 वर्षांनी काँग्रेस पक्षाध्यपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती विराजमान झाली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर (Shashi Tharoor) यांचा पराभव केला आहे.
गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी आहे. यापूर्वी सीताराम केसरी असे अध्यक्ष होते, जे गांधी घराण्यातील नव्हते. आता अत्यंत महत्त्वाच्यावेळी काँग्रेस पक्षाची जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आली आहे. त्यामुळे ती जबाबदारी ते किती सक्षमपणे पेलवतात, हे येणाऱ्या काळात समजेल. खरगे अध्यक्ष झाले मात्र त्यांच्यासमोरील आव्हान खऱ्याअर्थाने आता सुरु होणार आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खरगे काँग्रेस पक्षात किती आणि काय बदल करणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असतीय यावर एक नजर टाकूया. (Latest news)
हाय कमांड कल्चर
काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हायकमांड कल्चर आहे. म्हणजे राज्य पातळी असे वा राष्ट्रीय पातळीवरील निर्णय हे गांधी कुटुंबियांशी चर्चा करुन घेतले जातात. काँग्रेसमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांशी जुळवून घेण्याचं सर्वात मोठं आव्हान मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर असेल. काँग्रेस पक्षाचा रिमोट कंट्रोल सध्या गांधी घराकडे आहे. गांधी घराण्यातील सदस्य पक्षात कोणत्याही पदावर असोत, पण त्यांच्याशिवाय कोणताही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे पक्षाचे निर्णय मल्लिकार्जुन खरगेंना घेता येतील का हे पाहावं लागेल.
काँग्रेसला लागलेली गळती कशी थांबणार?
राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात कलह सुरू आहे. अशी काही उदाहरणं इतरही राज्यांमध्ये आहेत. त्यामुळे अंतर्गत कलहातून एकापाठोपाठ एक अनेक दिग्गजांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत पक्षात सुरू असलेली फूट थांबवणे हे खरगे यांच्यासमोर आव्हान असेल.
जनतेला काँग्रेसशी जोडणे
काँग्रेस पुन्हा निवडणूक जिंकू शकेल हे जनतेला पटवून द्यावं लागेल. त्यासाठी काँग्रेसला नव्या लोकांना पक्षात सामील करावे लागणार आहे. भाजप सारखा मोठा प्रतिस्पर्धी समोर असताना हे आव्हान तितकं सोपं नक्कीच नसेल. भाजपजी घोडदौड सुरु असताना त्यांचा विजय रथ रोखण्यासाठी विविध भागात नवं नेतृत्व उभं करणं महत्त्वाचं असेल.
आगामी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करणे
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यानंतर गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये दहा राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामध्ये कर्नाटकचाही समावेश आहे, जिथून स्वतः खर्गे येतात. 2024 मध्ये सात राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये चांगल्या कामगिरीचे आव्हान खरगे यांच्यासमोर आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.