सरकारनं घोषणा केली, पण रेशन दुकानांत १०० रुपयांच्या दिवाळी किटचा तुटवडा, कुठे, कशी आहे परिस्थिती? वाचा

गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल, प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Diwali Eknath Shinde Government Gift
Diwali Eknath Shinde Government GiftSaam TV
Published On

मुंबई : गोरगरीबांची दिवाळी (Diwali) गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने शंभर रुपयांमध्ये एक लिटर पामतेल, प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ या चार वस्तूंचे किट पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government)घेतला आहे. (Ration card Holders)

मात्र, दिवाळी काही दिवसांवर आली असून नागरिकांनी दिवाळीमधील फराळ करायला सुरुवात केली तरी देखील अद्याप राज्यभरातील अनेक रेशनिंगच्या दुकानातून या किटचे वाटप सुरू झालेले नाही. सरकारने घोषीत केलेल्या चार वस्तूंपैकी काही दुकानांमध्ये केवळ रवा, साखर तर काहि ठिकाणी पामतेल आले आहे.

पण या चारही वस्तू एकत्र आलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार कधी आणि ते दिवाळी करणार कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. याच शिधावाटपाची राज्यभरातील परिस्थितीचा साम टीव्हीने आढावा घेतला आहे. तो खालीलप्रमाणे -

पाहा व्हिडीओ -

नाशिक -

नाशिकमध्ये (Nashik) अद्यापही रेशन दुकानदारांना १०० रुपयांच्या किटची प्रतीक्षा असून किटमधील एकही वस्तू अद्याप रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ आली आहे. शिवाय पुढील १ ते २ दिवसांत किट उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भंडारा -

भंडाऱ्यात सरकारने जाहीर केलेल्या योजनेची 100 रूपयांची किट अद्यापही रेशन दुकानात आलेली नाहीत. त्यामुळे शिंदे सरकारने केवळ घोषणाबाजी केली का? दिवाळी केवळ काही दिवसांवर आली असताना त्याची अंमलबजावणी कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.

नागपूर -

नागपूरमधील रेशन दुकानांमध्ये १०० रुपयांच्या धान्य कीटमधील पामतेल, रवा, साखर या वस्तू रेशन दुकानात पोहोचल्या आहेत. मात्र, चणा डाळ अद्यापही रेशन दुकानात पोहोचलेली नाही त्यामुळे या किटचं वाटप करणं आजही शक्य नाहीये शिवाय चणा डाळ पोहोचली नसल्याने आज वितरण कसं होणारं असं दुकान मालकं देखील म्हणत आहेत. त्यामुळे नागपूरातील किट देखील नागरिकांपर्यतं आज तरी पोहचणार नाहीत.

पुणे -

पुण्यात (Pune) देखील इतर शहरांसारखीच परिस्थिती आहे. पुण्यातील अनेक रेशनिंग दुकानांमध्ये या वस्तू अद्यापही आलेल्या नाहीत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ७७० रेशनिंग दुकाने असून यातील काही दुकानात दोन वस्तू सध्या आल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून रेशनिंग दुकान चालक ही वैतागल्याची परिस्तिती आहे.

औरंगाबाद -

Diwali Eknath Shinde Government Gift
Positive News : भांडी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, साेन्याचे मंगळसूत्र परत केले

औरंगाबादमध्ये शंभर रुपयाच्या दिवाळीला साखरेची प्रतीक्षा अशून औरंगाबाद जिल्ह्यात साखर उपलब्ध झाली नसल्यानं वाटप थांबल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय आजा साखर येईल अशी शक्यता असून त्यानंतर उद्या रेशन दुकानात वाटप सुरू होईल, शहरातील काही दुकानात डाळ, रवा, तेल वाटप केल्याची जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी माहिती दिली आहे.

कोल्हापूर -

कोल्हापूरमध्येही सारखीच परिस्थिती असून अद्याप रेशनिंगच्या दुकानांवरती दिवाळी किट पोहचली नाहीत. मात्र, किट घेण्यासाठी सामान्य नागरिकांनी मात्र रेशन दुकानांवर मोठी गर्दी केली आहे पण सामानच पोहोच झालं नसल्यामुळे नागरिकाना रिकाम्या हाताने माघारी जावं लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केली मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार हाच प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com