Positive News : भांडी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, साेन्याचे मंगळसूत्र परत केले

विष्णू यांनी छाेट्यांसह माेठ्या विक्रेत्यांपुढे एक आदर्श ठेवल्याचे पाेलिसांनी नमूद केले.
nashik, gold, positive news
nashik, gold, positive newssaam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik : ऐन सणासुदीच्या काळात एका हातगाडीवर भांडे विक्रेत्याला चक्क सोन्याची (gold) पोत सापडली. त्यांनी ती पोत प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात आणून दिली. या भांडी विक्रेत्याच्या कृतीनं आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याची चर्चा नाशिक (nashik) शहर आणि परिसरात रंगली हाेती. अनेकांनी त्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत त्याचे अभिनंदन केले. (Nashik Latest Marathi News)

विष्णू सुरंजे हे मेन रोडला हातगाडीवर छोट्या छोट्या भांडे विक्रीचा व्यवसाय करतात. रात्री ते दुकान आवरत असताना त्यांना सोन्याच्या वाटी असलेली एक पोत सापडली आहे. सणासुदीचा काळ असल्याने मेन रोडवर वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे अशातच नेमकी ही पोत कोणाची पडली याबाबत पुरेशी माहिती नसल्याने विष्णू सुरंजी यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत भद्रकाली पोलीस ठाणे गाठले. (Maharashtra News)

nashik, gold, positive news
Aurangabad : मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर अपघात; मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

ती पोत पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आणि उपनिरीक्षक देविदास भालेराव यांना सुपूर्द केली. दरम्यान विष्णू सुरंजी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे पोलीस खात्याने काैतुक केले. विष्णू यांनी छाेट्यांसह माेठ्या विक्रेत्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे असेही पाेलीसांनी नमूद केले.

nashik, gold, positive news
Maharashtra News : कव्वाली कार्यक्रमात गाेळीबार ? व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान दुसरीकडे विष्णू सुरंजे यांचे सर्वसामान्य नागरिक देखील अभिनंदन करु लागले आहेत. विष्णु याच्या प्रामाणिकपणाचे काैतुक आहेच परंतु एकूणच दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळावेत असे आवाहन देखील पाेलीसांनी केले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

nashik, gold, positive news
Crocodile : मगर फिरतेय रस्त्यावर; सिंधुदुर्गासह कराडात भीतीचं वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com