Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये एका जागेवर बसून राहण्याची सवयी वाढत चालली आहे. मात्र याने तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो आणि भविष्यात तुम्हाला मोठ्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं.
तुम्ही सलग अनेक तास बसून राहिल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो.
सतत बसून राहिल्यावर पाय आणि शरीरातल्या मेटाबॉलिझमची सक्रियता कमी होऊ शकते. शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे शरीरातली ऊर्जा खर्चही कमी होतो.
जास्त वेळ बसून राहिल्यावर शारीरिक हालचाल कमी होते. त्याने फॅट वाढतो आणि वजन नियंत्रणात ठेवणं कठीण होतं.
बसून राहिल्यामुळे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे रक्तातल्या साखरेच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घेतली पाहिजे.
तासंतास बसून राहिल्याने पायांच्या भागातले रक्ताभिसरण कमी होण्याची शक्यता असते. हालचाल केली नाही तर ही समस्या वाढत जाते.
हालचाल कमी केल्याने शरीरातला फॅट वाढतो. याचा परिणाम कोलेस्ट्रोल आणि एकूण चयापचयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, कामाच्या पद्धतीनुसार दर ३० ते ६० मिनिटांनी काही मिनिटे उठणे, पाणी घेणे, चहा घेण्यासाठी जाणे किंवा थोडे चालणे अशी सवय लावता येते.
दीर्घकाळ बसून राहण्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा असू शकतो.तसेच वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.