Tomb of Aurangzeb Saam TV
महाराष्ट्र

Aurangzeb Tomb : कबरीचा वाद, सुरक्षेत वाढ; औरंग्याच्या कबरीच्या सुरक्षेसाठी सरकारला किती खर्च आलाय? वाचा आकडे

Tomb of Aurangzeb : औरंगजेबाच्या कबरीसाठी शासन धावून आलंय. कबरीच्या सुरक्षेसाठी लोखंडी पत्रे लावण्यात आलेत. आठवडाभरापासून कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता त्यापुढे जाऊन कबरीची सुरक्षा अधिक वाढवण्यात आलीय.

Tanmay Tillu

छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादला असलेल्या औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणाला पोहोचता येऊ नये यासाठी पुरातत्व विभागाने खबरदारीचे उपाय केले आहेत. तसंच पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय.. जैनूद्दीन शिराजी बाबांच्या दर्ग्याच्या बाजूनं पत्रे लावण्यात आलेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना राबवण्यात आल्यात. औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा कशी वाढवण्यात आलीये पाहूया...

कबरीसाठी शासन धावलं

- औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली

- कबर परिसर 18 एप्रिलपर्यंत 'रेड झोन' घोषित

- कबरीचे कापड हटवून लोखंडी पत्र्याची तटबंदी

- कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी

याआधीही भारतीय पुरातत्व खात्याकडून कबरीच्या सुरक्षेसाठी काहीशे लाख खर्च करण्यात आलायं पाहूया.

औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचा पैसा

2011-12 47 हजार

2012-13 80 हजार

2017-18 15 हजार

2020-21 2 लाख 55 हजार

2022-23 2 लाख 60 हजार

त्यामुळे औरंग्याच्या कबरीबाबत सरकार घेत असलेल्या दुटप्पी भुमिकेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केलीये. खुलताबाद येथील औरंगजेबची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद निर्माण झाल्याने, पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलायं. कबरीच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून आत कोणीही जाऊ नये, यासाठी लोखंडी अँगलला पत्रे मारण्यात आले आहेत. यापूर्वी हिरवा कपडा लावण्यात आला होता.हिरवा कपडा काढून त्या जागी लोखंडी पत्रे मारले आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी शासनच कबरीच्या सुरक्षेसाठी धावाधाव करताना दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये शेतजमिनीच्या रस्त्यावरून वाद

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT