Disha Salian Case : माझ्या मुलीची हत्या झालीय, आदित्यचं नाव घेत दिशा सालियनच्या कुटुंबियांची याचिका; पाहा स्पेशल रिपोर्ट

Disha Salian Death Case : दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मात्र हे आरोप काय आहेत? आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Disha salian Aditya thackeray
Disha salian Aditya thackeraySaam Tv
Published On

Disha Salian Case Update : दिशा सालियनची हत्या की आत्महत्या या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. कारण दिशा सालियनच्या आई आणि वडिलांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सुरज पांचोली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सालियन कुटुंबियांच्या याचिकेत काय?

- 8 जून 2020 रोजी दिशा सालियानच्या मालाडच्या घरी पार्टी

- पार्टी सुरु असताना ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरियाची अनपेक्षितपणे एण्ट्री

- दिशाचा सामुहिक बलात्कार

- प्रकरण दाबण्यासाठी दिशाची हत्या

- पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळण्यात आला

- फोरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार

- प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन

- सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंचे रिया चक्रवर्तीला 44 कॉल्स

- किशोरी पेडणेकरांनी आमची दिशाभूल करुन नजरकैदेत ठेवलं

Disha salian Aditya thackeray
Abu Azmi Aurangzeb Tomb : लोकांना भडकवण्याचा प्रयत्न... औरंगजेबाची कबर उखडण्यावरुन अबू आझमींचा संताप

या याचिकेनंतर सतीश सालियन यांच्या वकिलांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय. तर पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत आलेलं हे प्रकरण म्हणजे ठाकरे कुटुंब बदनाम करण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

Disha salian Aditya thackeray
Indian Railway : रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट! उन्हाळी सुट्यांनिमित्त धावणार तब्बल ३३२ विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला... त्यानंतर 5 वर्षांनी हे प्रकरण पुन्हा तापलं आहे... मुळातच इतक्या वर्षांनंतर हे प्रकरण बाहेर का आलं...? दिशा सालियनच्या कुटुंबियांवर दबाव होता का? दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचं काय झालं? की काही महिन्यांवर आलेल्या बिहार विधानसभा आणि मुंबई महापालिकेसाठी दिशा सालियन मृत्यू प्रकऱण तापवलं जातंय ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.. त्यामुळे आता न्यायालयानंच या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देऊन राजकारणाची होत असलेली दशा थांबवायला हवी. अन्यथा राजकारणाची दिशा भरकटल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com