Nandurbar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने दगडफेक करून हल्ला करण्यात आला. शिवाय जप्त केलेली दारू व वाहन बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

Alisha Khedekar

  • अवैध दारू कारवाईसाठी गेलेल्या उत्पादन शुल्क पथकावर हल्ला

  • १९.४० लाख रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल आरोपींनी पळवला

  • दगडफेक व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

  • धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिवाय निगदी फाटा परिसरात आरोपींनी पथकावर दगडफेक करत जप्त केलेली दारू आणि वाहन बळजबरीने पळवून नेले. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या पथकाने निगदी शिवारात छापा टाकून १९ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये विदेशी दारूचे २०० बॉक्स आणि एका पिकअप वाहनाचा समावेश होता. मात्र, कारवाई सुरू असतानाच बुधा झांगडे आणि सुरेश झांगडे यांच्यासह १० ते १२ जणांच्या जमावाने पथकाला घेरले.

मात्र, कारवाई सुरू असतानाच बुधा झांगडे आणि सुरेश झांगडे यांच्यासह १० ते १२ जणांच्या जमावाने पथकाला घेरले. वाहन पुढे नेल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी जोरदार दगडफेक केली आणि जप्त केलेला मुद्देमाल बळजबरीने पळवून नेला.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धडगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeveless Blouse Pattern: स्लिव्हलेस ब्लाऊजच्या या 5 डिझाईन्स, हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड|VIDEO

Health Care : जास्त प्रमाणात खजूर खाल्याने आरोग्यावर होतात 'हे' 5 गंभीर परिणाम; जाणून घ्या

Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

SCROLL FOR NEXT