Ranji Trophy Final : जम्मू-काश्मीरनं इतिहास रचला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

Ranji Trophy, KAR vs JK Final : कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या फायनलमध्ये जम्मू-काश्मीरनं बाजी मारत रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून ट्रॉफी जिंकणारा जम्मू-काश्मीर संघ हा नववा संघ ठरला आहे.
Ranji Trophy Jammu Kashmir Team Champion
Ranji Trophy Jammu Kashmir Team Championsaam tv
Published On

Ranji Trophy, KAR vs JK Final : रणजी ट्रॉफी एलीट २०२५-२६ च्या फायनलमध्ये जम्मू-काश्मीरने इतिहास रचला. जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी विजेता ठरला. कर्नाटक संघाविरुद्ध त्यांनी हा ऐतिहासिक विजय साकारला. फायनलच्या सामन्यात अखेरच्या दिवशी जम्मू-काश्मीरनं ५५० धावांपेक्षा अधिकची आघाडी घेतली होती. त्यामुळे हा सामना अनिर्णित ठरला आणि जम्मू-काश्मीरने या आघाडीसह रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

हुबळीच्या केएससीए हुबळी क्रिकेटच्या मैदानात ही फायनल लढत झाली. सामन्याच्या पाचव्या दिवशी जम्मू-काश्मीरने कर्नाटक संघाला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या डावात जम्मू-काश्मीरने ४ विकेटच्या बदल्यात ३४२ धावा केल्या. सलामीवीर कमरान इकबाल आणि साहिल लोत्रा यांनी शतकी खेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार ठरले. अब्दुल्ला हे फायनलच्या अखेरच्या दिवशी हुबळीच्या मैदानात पोहोचले आणि त्यांनी खेळाडूंचा विश्वास वाढवला. संघाने विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी जल्लोष करत त्याचा व्हिडिओ एक्स सोशल मीडियावर शेअर केला. आता तो व्हायरल होत आहे.

Ranji Trophy Jammu Kashmir Team Champion
Ind Vs Aus : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा पराभव, ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर कब्जा

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवरच आटोपला. कर्णधार मयंक अग्रवाल यानं एका बाजूनं किल्ला लढवला. २१ चौकारांच्या मदतीनं त्यानं १६० धावांची संयमी खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला कुणाचीही साथ मिळाली नाही. कृतिक कृष्णा यानं ३६ धावा, श्रेयस गोपाल यानं २७ धावांचं योगदान दिलं. मयंक आणि कृतिक यांनी सहाव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. कृतिक बाद झाल्यानंतर कर्नाटकचा डाव गडगडला.

Ranji Trophy Jammu Kashmir Team Champion
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं संपवला धावांचा दुष्काळ; टी २० वर्ल्डकपमध्ये ठोकली पहिली तुफानी फिफ्टी

कर्नाटक संघानं आपले अखेरचे चार शिलेदार अवघ्या ५२ धावांत गमावले. त्यामुळे मोठी आघाडी घेण्याचे मनसुबे उधळले गेले. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीर संघाने पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारून अखेरच्या सामन्यावर वर्चस्व मिळवले. जम्मू काश्मीर संघ पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला आणि रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणारा नववा संघ ठरला. याआधी बॉम्बे, नवानगर, महाराष्ट्र, बडोदा, कर्नाटक, पंजाब, हैदराबाद आणि विदर्भ संघाने अशी कामगिरी केली होती.

पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचून विजेतेपद पटकावणारे संघ

बॉम्बे - १९३४-३५, नवानगर - १९३६-३७, हैदराबाद - १९३७-३८, महाराष्ट्र - १९३९-४०, बडोदा - १९४२-४३, कर्नाटक - १९७३-७४, पंजाब - १९९२-९३, विदर्भ - २०१७-१८ आणि जम्मू-काश्मीर - २०२५-२६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com