Ind Vs Aus : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा पराभव, ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर कब्जा

Ind W vs Aus W ODI Series : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियानं दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घातली.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव, ऑस्ट्रेलियानं वनडे मालिका जिंकली
Ind - w vs Aus-w ODI Match HighlightsBCCI /x
Published On

वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियात वनडे मालिका गमवावी लागली. मागील वर्षी वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या सामन्यात पराभव केला. होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २२ वर्षीय फलंदाज जॉर्जिया वॉल हिने ठोकलेले धमाकेदार शतक आणि फीबी लिचफील्डच्या तडाखेबंद फलंदाजीमुळं २५२ धावांचं आव्हान सहज पार केलं. पाच विकेट राखून त्यांनी भारतीय संघावर विजय मिळवला.

नोव्हेंबर २०२५ मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं सलग दोन टी २० मालिकांमध्ये विजय मिळवला होता. एक मालिका तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात झाली होती. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची ही पहिलीच मालिका होती. वनडे मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. सलग दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

भारतीय संघाच्या फलंदाजांनी केली निराशा

होबार्टमध्ये शुक्रवारी, २७ फेब्रुवारीला वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मंधाना हिनं ३१ धावा, तर प्रतिका रावल हिनं ५२ धावांची खेळी केली. या दोघींनी चांगली सुरुवात करून दिली. ७८ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर १०० धावांवर भारताचे तीन फलंदाज बाद झाले. कर्णधार हरमनप्रीतवर सगळी धुरा आली. मात्र, दुसऱ्या बाजूने तिला कोणीही साथ दिली नाही. हरमनप्रीत आणि काश्वी गौतम यांच्यात ५५ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे संघाला किमान २५१ धावांपर्यंत मजल मारता आली.

वॉल-लिचफील्डची खतरनाक बॅटिंग

कारकीर्दीतील अखेरची मालिका खेळणारी ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली ही अवघ्या ६ धावा करून बाद झाली. फीबी लिचफील्ड हिने ६२ चेंडूंत ८० धावा, तर वॉल हिने ८२ चेंडूंत १०१ धावांची स्फोटक खेळी केली. या दोघींनी ११९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताला कमबॅक करता आलं नाही. लिचफील्डचं शतक हुकलं, पण वॉलने आपलं शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियानं ३७ व्या षटकातच ५ विकेट राखून सामना जिंकला आणि ही वनडे मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १ मार्च रोजी होबार्टमध्येच खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव, ऑस्ट्रेलियानं वनडे मालिका जिंकली
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं संपवला धावांचा दुष्काळ; टी २० वर्ल्डकपमध्ये ठोकली पहिली तुफानी फिफ्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com