ST Mahamandal Saam Tv
महाराष्ट्र

ST Mahamandal: लाडक्या बहिणींमुळे एसटी महामंडळाचे अच्छे दिन; सरकारकडून परिवहन विभागाला ५०८० कोटी रुपये

ST Mahamandal Half Ticket For Women: लाडक्या बहिणींमुळे एसटी महामंडळाला फायदा झाला आहे. एसटी महामंडळाने महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. यामुळे महिलांच्या प्रवासाची संख्या वाढली आहे.

Siddhi Hande

लाडकीनंतर महिलांसाठी आणखी एक योजना

महिलांना एसटीच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत

सरकारी योजनेमुळे परिवहन महामंडळाला फायदा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. एसटी महामंडळानेही महिलांसाठी खास योजना राबवली आहे. एसटीमधून महिलांना हाफ तिकीट दरात प्रवास करता येणार आहे. तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. विधानसभा निवडणुकीआधी ही घोषणा केली होती. यामुळे निवडणुकीत खूप फायदा झाला आहे.

तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत देण्यासाठी राज्य सरकारने ३५ महिन्यात तब्बल ८० कोटी रुपये मोजले आहेत. मात्र, या योजनेमुळे परिवहन मंडळाची स्थिती सुधारली आहे. महिलांनी प्रवास करण्याची संख्या वाढली आहे.

राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यात दरवर्षी दोन हजार नवीन गाड्या दाखल होत आहेत. जुन्या बस नसल्याने आता अनेक प्रवासी एसटी महामंडळाने प्रवास करु लागली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारु लागली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही योजना

सरकारने वृद्ध नागरिकांसाठीही अमृत ज्येष्ठ नागरिक योजना सुरु केली आहे. यामध्ये वृद्ध नागरिक मोफत प्रवास करतात. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटाचे दर अर्धे आहे. महिलांसाठी हाफ तिकीट आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.यामुळे एसटी महामंडळाला फायदा होताना दिसत आहे.

या योजनेची सुरुवात १७ मार्च २०२३ रोजी झाली होती. यामध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली. त्यानंतर महिला प्रवाशांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी प्रवास केला आहे. या योजनेसाठी शासनाकडून महामंडळाला ५०८०.४३ कोटी रुपये मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Maharashtra News Live Update: सिंधुदुर्गात अखेर दमदार पावसाने पुनरागमन

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; महायुतीकडून विश्वासघात झाल्याचा दराडेंचा आरोप

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन

SCROLL FOR NEXT