ST Bus Employee  Google
महाराष्ट्र

ST Bus Fare Hike : एसटी बसचे नवे दर लागू, लालपरी ते शिवनेरी...कोणत्या बसला किती तिकीट, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra ST bus : एसटी बसचे नवे दर लागू होत आहे. राज्यात लालपरी ते शिवनेरीच्या तिकीटाचे दर वाढू झाले आहेत. कोणत्या बसला किती तिकीट असणार आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती, एका क्लिकवर

Saam Tv

मुंबई : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाला आहे. तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६ वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) आणि परिवहन आयुक्त उपस्थित होते.

या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार : साध्या एसटी बसचे सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे या सेवेचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये.

ई बस ०९ मीटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

ई-शिवाई / ई बस १२ मीटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT