Tata Motors: मजेंटा मोबिलिटी टाटा मोटर्समध्ये आणखी एक करार; १००हून अधिक टाटा एस ईव्हीचा आपल्या ताफ्यात केला समावेश

Magenta Mobility Partneship With Tata Motors: मजेंटा मॉबिलिटीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने आपल्या ताफ्यात १०० हून अधिक टाटा मोटर्स एसचा समावेश केला आहे.
Tata Motors
Tata MotorsSaam Tv

टाटा कंपनी नेहमीच पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेत असते. त्यामुळेच कंपनीने आपली टाटा एस ईव्ही तयार केली आहे. देशभरात या वाहनाची मागणी वाढत आहे. तर आता मजेंटा मोबिलिटी या कंपनीने टाटा एस ईव्हीच्‍या १००हून अधिक युनिट्सचा समावेश आपल्या ताफ्यात करून भारतातील व्यावसायिक वाहनांची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबतची भागीदारी अधिक दृढ केली आहे. यामध्ये ६०हून अधिक युनिट्स एस ईव्हीचे आहेत, तर ४०हून अधिक युनिट्स एस ईव्ही १०००चे आहेत.

दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये केलेल्या एका कराराचा भाग म्हणून ही वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत. या करारात क्रांतिकारी टाटा एस ईव्हीच्या ५०० युनिट्सचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

मजेंटा मोबिलिटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मॅक्सन लेविस यांनी सहयोगाबद्दल उत्साह व्यक्त केला. सप्टेंबर २०२५ पर्यंत १०,००० इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. टाटा मोटर्सच्या चारचाकी छोट्या व्यावसायिक वाहनांमधील (एससीव्ही) कौशल्याचा मेळ आमची लॉजिस्टिक क्षमता, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाशी घातला गेल्यामुळे हा सहयोग उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी सज्ज आहे."

टाटा मोटर्सच्या एससीव्हीपीयू विभागाचे व्यवसाय प्रमुख तसेच उपाध्यक्ष श्री. विनय पाठक या घोषणेबद्दल म्हणाले, “मजेंटा मोबिलिटीशी झालेल्या आमच्या सहयोगातील महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. त्यांच्या ताफ्यात टाटा एस इव्हींचा समावेश झाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे. प्रगत, शून्य-उत्सर्जन वाहतूक उत्पादनांच्या माध्यमातून शहरांतर्गत वितरणामध्ये क्रांती घडवून आणण्याचे आमचे सामूहिक उद्दिष्ट यामुळे अधोरेखित झाले आहे. एस ईव्ही हे आमच्या सहनिर्मिती प्रयत्नांतून तयार झालेले उत्पादन अद्वितीय कामगिरी, खात्रीशीरता आणि कार्यात्मक कार्यक्षमता देऊ करते. त्याचबरोबर भारताच्या पर्यावरणपूरक भवितव्यामध्ये योगदान देते. शाश्वत ई-कार्गो वाहतूकीची साधने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याप्रती आमची बांधिलकी या वाहनांच्या समावेशातून सिद्ध झाली आहे. आम्ही एकत्रितपणे अधिक स्वच्छ, पर्यावरणपूरक व पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक भारताच्या भवितव्याचा मार्ग खुला करत आहोत."

Tata Motors
६ एअरबॅग्ज अन् जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह Skoda Kushaq Onyx भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

एस ईव्हीमध्ये ईव्होजेन इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन ड्रायव्हिंगचा अफलातून अनुभव देते. बॅटरीची ७ वर्षांची वॉरंटी आहे, तर ५ वर्षांचे सर्वसमावेशक देखभाल पॅकेज यासोबत मिळते. यामुळे सर्व प्रकारच्या हवामानात सुरक्षिततेही हमी मिळते. यामध्ये प्रगत बॅटरी कूलिंग प्रणाली तसेच रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगची कक्षा विस्तारली जाऊ शकते. या बॅटरीचे चार्जिंग नियमितपणे करणे आवश्यक आहे.त्यामुळे चार्जिंगमध्ये जास्त वेळ टिकते. २७ किलोवॉट (३६ अश्वशक्ती) क्षमतेची मोटर यात आहे, १३० एनएमचा सर्वोच्च टॉर्क आहे. त्यामुळे सर्वोत्तम पिक-अप मिळतो तसेच वाहन पूर्ण भरलेले असताना सहजगत्या चढ पार करून देण्याची क्षमता मिळते.

Tata Motors
Bank Employees DA Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात १६ टक्क्यांची वाढ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com