Bank Employees DA Hike : बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात १६ टक्क्यांची वाढ

16 Percent DA Hike : इंडियन बँक असोसिएशनने (IBA) १० जून २०२४ रोजी याबाबत घोषणा केली. घोषणेनुसार एकूण १५.९७ टक्के इतका महागाई भत्ता वाढवण्यात येत आहे.
Bank Employees DA Hike
Bank Employees DA HikeSaam TV

बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर समोर आली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. तब्बल १६ टक्क्यांपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता मे, जून आणि जुलै २०२४ साठी देण्यात येणारे. इंडियन बँक असोसिएशनने (IBA) १० जून २०२४ रोजी याबाबत घोषणा केली. घोषणेनुसार एकूण १५.९७ टक्के इतका महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

Bank Employees DA Hike
Manmad Union Bank: युनियन बँक एफडी घोटाळ्यापाठाेपाठ बॅंक प्रतिनिधीवर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

८ लाख कर्मचाऱ्यांना फायदा

या आधी मार्च २०२४ मध्ये IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी १७ टक्के वार्षिक वेतनवाढीवर सहमती दर्शविली होती. यावर काही बैठका पार पडल्या. त्यानंतर १५.९७ टक्के इतका महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सुमारे ८,२८४ कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च वाढणार आहे.

५ दिवसांचा आठवडा

बँक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून ५ दिवसांचा आठवडा मिळावा यासाठी मागणी करत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना एक आठवडा वगळून दुसऱ्या आठवड्यात शनिवार आणि रविवार सुट्टी मिळते. मात्र सरसकट बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा द्यावा अशी मागणी केली जात आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या जून महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील.

2 जून 2024- रविवार साप्ताहिक सुट्टी.

8 जून 2024- महिन्याचा दुसरा शनिवार.

9 जून 2024 - रविवारमुळे बँक बंद.

16 जून 2024- रविवारमुळे बँका बंद.

22 जून 2024- महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे बँका बंद.

23 जून 2024- रविवारमुळे बँका बंद.

30 जून 2024- रविवारमुळे बँका बंद.

10 जून 2024 - श्री गुरु अर्जुन देवजी हुतात्मा दिनानिमित्त पंजाबमध्ये बँका बंद.

14 जून 2024 - पाहिली राजामुळे ओडिशामध्ये बँका बंद राहतील.

15 जून 2024 - मिझोराम या ईशान्येकडील बँका बंद राहतील.

17 जून 2024 - बकरी ईदनिमित्त बँका बंद राहतील.

21 जून 2024 - वटपौर्णिमानिमित्त बँका बंद राहणार आहेत.

Bank Employees DA Hike
DCW Employees Fired: दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचारी बडतर्फ.. उपराज्यपालांची मोठी कारवाई; कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com