SSC -HSC Result 2025 Canva
महाराष्ट्र

SSC-HSC Result 2025: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयार रहा! मे महिन्यात 'या' तारखेला लागणार निकाल

SSC-HSC Result Date: दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाची संभाव्य तारीख समोर आली असून मे महिन्यात निकाल लागणार आहे. तारीख घ्या जाणून....

Priya More

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची निकालाची प्रतीक्षा लककरच संपणार आहे कारण निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल येत्या १५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षा होऊन एक महिना झाला. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी टेन्शन फ्री झाले होते पण आता लवकरच निकाल लागणार असल्यामुळे ते चिंतेत देखील आले आहेत. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे. पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. अशामध्ये निकालची तारीख देखील समोर आली आहे. येत्या १५ मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

साधारणत: बारावीचे निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतात. मागच्या वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी लागला होता. तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. पण यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तयार राहावे असे सांगितले जात आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकीटाचा नंबर असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तुम्हाला कोण-कोणत्या वेबसाइटवर पाहयला मिळणार हे घ्या जाणून....

- mahahsscboard.in

- mahresult.nic.in

- hscresult.mkcl.org

- msbshse.co.in

- mh-ssc.ac.in

- sscboardpune.in

- sscresult.mkcl.org

- hsc.mahresults.org.in

असा चेक कराल निकाल -

- विद्यार्थ्यांनो सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.

- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.

- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.

- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT