HSC, SSC Result : दहावी आणि बारावीची परीक्षा (10th and 12th Exam Result) दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावी आणि दहावीचा निकाल गत वर्षी पेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल (HSC Result 2025) जाहीर होऊ शकतो. तर दहावीचा (SSC Result 2025) निकाल त्यानंतर १० दिवसांत लागू शकतो.
विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला १२ वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतेय. निकाल ऑनलाईन कसा पाहाल? Steps to Check Maharashtra Class 12th Result Online
mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. संकेतस्थळावर जा
“एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025” या लिंकवर क्लिक करा.
आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाका.
‘निकाल मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह प्रदर्शित होईल.
निकालाची प्रत डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.