SSC-HSC Exam: 10वी आणि 12वी परीक्षेत कॉपी कराल तर खबरदार; विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

10th and 12th Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीच्या परीक्षा निकट आल्याने विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी कॉपी पकडल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होईल, असे सांगितले.
SSC-HSC Exam
SSC-HSC ExamFreepic
Published On

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्याने विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, परीक्षांमध्ये कॉपी करताना पकडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळ कडक उपाययोजना राबवत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये प्रामाणिकपणे सहभाग घ्यावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

११ फेब्रुवारीपासून सुरू होणारी १२वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. कॉपीमुक्त अभियान राबवत परीक्षेसाठी आवश्यक नियमावली विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता शांतपणे आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असेही गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

SSC-HSC Exam
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट, कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्र कायमचं रद्द

परीक्षेसाठी विद्यार्थी हॉल तिकीट विसरल्यास घाबरण्याचे कारण नाही असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. हॉल तिकीट नसल्यानाही विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. पुढील दिवशी मात्र हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षेसाठी वेशभूषेवर कोणतेही बंधन नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मंत्री नितेश राणे यांनी बुरखा घालण्यास बंदीची मागणी केली होती मात्र परीक्षा मंडळाने कोणत्याही वेशभूषेत परीक्षा केंद्रावर येण्यास परवानगी दिली आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच प्रवेश दिला जाईल असे मंडळाने सांगितले आहे.

SSC-HSC Exam
SSC-HSC Exam: ड्रोनच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर नजर, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांना परीक्षा ताणतणाव कमी करण्यासाठी समुपदेशकांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा कशी द्यायची, याबाबत तणाव असल्यास ते समुपदेशकांशी थेट फोनवर संपर्क साधू शकतात असे शरद गोसावी यांनी सांगितले. मात्र परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून परीक्षा पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com