फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेने महाराष्ट्र कासावीस झालाय. फेब्रुवारी महिना १२५ वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. मार्च महिन्यात तर राज्यात काही ठिकाणी पारा 41 अंशावर गेल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यातच महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारी बातमी आलीय. कारण भविष्यात तापत्या उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत. मुंबईकरांसाठी तर ही धोक्याची घंटा आहे.
उन्हामुळे मृत्यूंचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. मुंबईसह 9 शहरांना अलर्ट देण्यात आलाय. वाढत्या तापमान आणि आर्द्रतेमुळे हीट इंडेक्स प्रचंड वाढणारेय. शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूंचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं, असा इशारा अभ्यासकांनी दिलाय. सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्ह संस्थेने 'इज इंडिया रेडी फॉर अ वॉर्मिंग वर्ल्ड' हा अहवालात प्रसिद्ध केलाय. यामध्ये कुठल्या शहराला धोक्याचा इशारा दिलाय ते पाहूया..
मुंबई
दिल्ली
बंगळुरू
सुरत
ग्वाल्हेर
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा इशारा आहे. दीर्घकालीन नियोजन न झाल्यास उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढू शकेल, असा तज्ञांचा इशारा आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा दोन कोटी आहे. सध्या हे शहर अकाली आणि विस्तारित उष्णतेच्या लाटांचा अनुभव घेत आहे.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईत तापमान वाढते. वाढत्या आर्द्रतेमुळे एखाद्या परिसराचे उष्णता निर्देशांक मूल्य वाढते. ज्यामुळे शरीराची लवचिकता आणि घामाद्वारे अति उष्णतेचा सामना करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. यावर तज्ञांनी उपाययोजनाबाबत इशारा दिलाय. वाढत्या तापमानात नगर नियोजन महत्वाचं, असं पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण म्हणाल्या.
राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी, बांधकाम कामगार आणि इतर बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींना विशेषतः धोका आहे. उच्च तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील लोकसंख्येची घनता, फसलेले शहर नियोजन , नाहीसा होत असलेला हरित पट्टा आणि हवेतील आद्रतेमुळे या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.