Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला वेग; खोटे कागदपत्र तयार करणाऱ्याला बसला पहिला दणका?

Dombivli Latest News : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला वेग आलाय. खोटे कागदपत्र तयार करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Dombivli News
Dombivli News Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवली : 65 बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात बनावट सातबारा,बनावट एन ए प्रकरणी तहसीलदारांच्या आदेशानंतर रामनगर पोलीस ठाण्यात साई गॅलेक्सी इमारतीचे बिल्डर शालीन भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शालेय भगतचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली. याबाबत म्हात्रे यांनी डीसीपी पराग मनेरे यांची भेट घेत शालीन भगत हा प्यादा आहे,त्याच्या मागचा प्रमुख आरोपी अटक झाली पाहिजे, अशी मागणी केल्याचे सांगितले.

Dombivli News
Sunita Williams Return : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार, नासाची तयारी पूर्ण, केव्हा होणार लँडिंग?

६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरने खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीवर एमपीडीए कारवाई होणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.

६५ बेकायदा बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिले आहे. या इमारतीत घरे घेणाऱ्या रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या रहिवासीयांची घरे वाचविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी पोलीस आयुक्त आशूतोष डुंबरे, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

Dombivli News
Pune Crime: होणाऱ्या नवऱ्यासोबत रात्री घराबाहेर पडली, वाटेत गुंडांनी अडवले अन्....

प्रांत अधिकारी गुजर यांनी या प्रकरणात खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. तहसीलदार शेजाळ यांनी खोटे कागदपत्रे तयार करणारे साई डेव्हलर्पचे भागीदार शालीक भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले होते. या प्रकरणात पोलिसांनी भगत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कागदपत्रांची चौकशी तपासणी सूरु केली आहे.या दरम्यान भगत याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

Dombivli News
Kalyan Crime : आठ वर्षांचा मुलगा, मारहाण केली, नंतर लादीवर बसवलं; शिक्षिकेचा निर्दयीपणा

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी काल सायंकाळी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी पराग मणेरे यांची भेट घेतली. खोटे कागदपत्रे प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी मणेरे यांनी ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरानी खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीवर एमपीडीए केली जाईल असे आश्वासन दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com