Sunita Williams Return : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार, नासाची तयारी पूर्ण, केव्हा होणार लँडिंग?

Sunita Williams Return mission : सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहे. नासाची तयारी पूर्ण झाली आहे. अंतराळवीरांचं लँडिग कधी होणार, जाणून घेऊयात.
Sunita Williams Return mission
Sunita Williams ReturnSaam tv
Published On

Sunita Williams Return : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अखेर ९ महिन्यांनी आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर परतणार आहे. सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांच्यासहित चार अंतराळवीर आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर परतण्यास रवाना झाले आहेत. अंतराळवीराच्या प्रवासावर साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अंतराळवीर सुनीता विलियम्स तब्बल ९ महिन्यांनी परतणार असल्याने साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Sunita Williams Return mission
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजनेत होणार बदल? वाचा सविस्तर

सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना काही आठवड्यांसाठी आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठण्यात आलं होतं. मात्र, अंतराळ यान, बोईंग स्टारलायनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या ९ महिन्यांपासून अडकले होते. सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे पृथ्वीवर सात टप्प्यात परतणार आहेत.

Sunita Williams Return mission
Uddhav Thackeray : गृहखातं झोपा काढत होतं का? नागपूर हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंनी थेट CM फडणवीसांना सुनावलं

अंतराळवीर पृथ्वीच्या दिशेने

सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे अंतराळवीर 'स्पेसएक्स'च्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहेत. भारतीय वेळेनुसार, आज १८ मार्च रोजी १०.३५ वाजता अंतराळयान आंतराष्ट्रीय अंतराळ स्टेशनपासून वेगळं केलं जाईल. ड्रॅगन हे अनडॉक करण्यावर अवलंबून आहेत. यात क्राफ्ट आणि रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थितीचा समावेश आहे.

Sunita Williams Return mission
Success story : दोन वेळ खाण्याची भ्रांत, वडिलांना महिना १२ हजार पगार; लेकीला मिळाली ४५ लाखांच्या नोकरीची ऑफर

सकाळी ८.१५ वाजता यानाचं झाकण बंद होईल. त्यानंतर सकाळी १०.३५ वाजता अनडॉकिंग होईल. यात वाहन आयएसएसपासून वेगळं केलं जाईल. १९ मार्च रोजी पहाटे २.४१ वाजता वातावरणात वाहनाचा प्रवेश होईल. त्यानंतर पहाटे ३.२७ वाजता हे यान समुद्रात उतरलेल. त्यानंतर पहाटे ५ वाजता पृथ्वीवर परतण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात होईल. एकंदरित सुनीता आणि बूच हे १९ मार्च रोजी पृथ्वीवर परततील. या दोघांना पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास लागतील. हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्याजवळ पाण्यात उतरणार आहे. त्यानंतर यानातून सर्व अंतराळवीरांना यानातून बाहेर काढलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com