Scholarship Saam Tv
महाराष्ट्र

Scholarship News: मोठी बातमी! आता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती; नियम बदलले; वाचा सविस्तर

5th And 8th Scholarship News: शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या नियमात बदल केले आहेत. पुढच्या वर्षीपासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसता येणार आहे.

Siddhi Hande

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पुढच्या वर्षीपासून पाचवी अन् आठवीची शिष्यवृत्ती बंद

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पुढील वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यास मान्यता दिली आहे. ही अंबलबजावणी पुढील वर्षापासून होईल.या चालू वर्षात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

साधारणपणे फेब्रुवारी २०२६ मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येईल. तर २०२६-२०२७ पासून चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे.

चौथीसाठी प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये आणि सातवीसाठी सात हजार रुपये प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील गरीब, होतकरु आणि हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.

अटी

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता शासनमान्य (शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देण्यास पात्र आहे. सीबीएसई, आईसीएसई आणि इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अटींचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थी ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमाल वय १० वर्षे असावे.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १४ पेक्षा जास्त वय नसावे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा १३ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १७ वर्षे असावे.

किती शिष्यवृत्ती मिळणार? (4th And 7th Scholarship Amount)

दरम्यान आता चौथीच्या शिष्यवृत्तीसाठी दर महिन्याला ५०० रुपये म्हणजे प्रत्येक वर्षी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सातवीच्या शिष्यवृत्तीलाठी ७५० रुपये प्रति महिन्याप्रमाणे ७ हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT