Maharashtra Government: शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात मोठी वाढ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Farmers Foreign Study Tours : जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते.
Farmers Foreign Study Tours
Agriculture Minister Datta Bharane announces ₹2 lakh subsidy for farmers’ foreign study tours to promote modern farming practices.saam tv
Published On
Summary
  • परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी अनुदानाची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत.

  • कृषी विभागामार्फत या परदेश दौऱ्यांचे आयोजन

  • २०१२ नंतरच्या दरवाढीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्या आयोजित केले जातात. या दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञानाची माहिती होत असते. या परदेश दौऱ्याच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय कृषी मंत्र्यांनी घेतलाय. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनात दरवाढ झालीय.

ही बाब लक्षात घेत आता अनुदान मर्यादा दुप्पट करत २ लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कृषी मंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे.

Farmers Foreign Study Tours
Government Scheme: पशुपालनाचा व्यवसाय करायचाय,पण गोठा नाहीये; सरकार देणार गाई-म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे”आयोजित केले जातात. या अभ्यास दौऱ्याच्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत प्रति शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे.

Farmers Foreign Study Tours
Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जारी करण्यात आलाय. दरम्यान राज्यातील शेतकरी या योजनेअंतर्गत परदेशात जात असतात. राज्यातील शेतकरी अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशांतील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पीक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, यांचा अभ्यास करून आलेत.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, " या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रु.२ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव घेता येईल तसेच प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबविण्याची प्रेरणा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com