MAHARASHTRA MONSOON INTENSIFIES; IMD ISSUES YELLOW ALERT FOR 15 DISTRICTS Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : मुंबईसह २४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे; वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभागाने २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांसाठी IMD चा यलो अलर्ट

  • मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

  • हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update News राज्यभरात मान्सूनने चांगलाच जोर धरला असून नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचा आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या प्रतीक्षेमुळे यंदा खरीप हंगामातील पेरणी काही प्रमाणात लांबणीवर पडली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतीला सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT