Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update : ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर ८ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट, राज्यभरात कशी असेल स्थिती?

Rain News Update : पावसाला पोषक हवामान असल्याने पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

प्रविण वाकचौरे

Weather News Update :

उत्तर कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित कोकणासह नंदूरबार, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

आज घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Latest Marathi News)

मुंबई-पुण्याला यलो अलर्ट

पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुण्यासह आठ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्हांमध्ये जोरदर पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, जेथे पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मोदी सरकारचं शेतकऱ्यांना ४२००० कोटींचं गिफ्ट! दोन दिवसांत करणार मोठी घोषणा

Political News : मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निवडणुकीआधीच माजी मंत्र्याने पक्षाची साथ सोडली

Sachin Pilgaonkar: 'उर्दू ही हिंदूंचीच भाषा...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Maharashtra Live News Update: नागपूर मधील सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी निलंबित

'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT