Mumbai-Goa Higway Accident : कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू १९ जण जखमी

Accident News : माणगावनजीक रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
Mumbai-Goa Higway Accident
Mumbai-Goa Higway AccidentSaam TV

सचिन कदम

Raigad News :

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात घटला आहे. माणगावनजीक रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात एसटीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. (Latest Marathi News)

Mumbai-Goa Higway Accident
Weather Forecast: गणरायाच्या आगमनासह पाऊसही परतणार, 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?

जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

Mumbai-Goa Higway Accident
Marathwada Cabinate Meeting: मराठवाड्यासाठी 46 हजार कोटींचं पॅकेज जाहीर; कोणती होणार विकास कामे? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गणेशोत्सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com