Weather Forecast: गणरायाच्या आगमनासह पाऊसही परतणार, 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?

Rain Update News: 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?
Weather Forecast News
Weather Forecast NewsSaam TV
Published On

Rain Update News:

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये शनिवारी (१६ सप्टेंबर) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, जेथे पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालगड आणि धुळे येथे मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Forecast News
C-295 Aircraft: शत्रू देशांचे धाबे दणाणणार! C-295 विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात होणार दाखल, जाणून घ्या काय आहे खास...

हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्याचवेळी पावसाचा सर्वाधिक परिणाम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जाणवत आहे. इंदूरमध्ये पावसामुळे आज सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील पालघर आणि धुळे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशातील विविध भागात पावसासाठी हवामान विभागाने रेड, यलो आणि ऑरेंज असे तीन प्रकारचे अलर्ट जारी केले आहेत. छिंदवाडा, निवारी, रायसेन आणि नर्मदापुरममध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता इंदूर, नर्मदापुरम आणि हरदा येथे शनिवारी शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तवा धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.

Weather Forecast News
OBC Reservation: 'ओबीसी आरक्षणात वाटेकरी येऊ देणार नाही', उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

मान्सून परतण्याचं कारण काय?

स्कायमेटचे हवामान शास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले की, अचानक मान्सून परतण्याचं कारण म्हणजे बंगालचा उपसागर आहे. कारण तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य भारतात पाऊस पडत आहे. महेश पलावत म्हणाले की, दिल्ली एनसीआरमधील बदललेल्या हवामानामुळे तापमानात थोडीशी घसरण होईल, पण आर्द्रता कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com