अक्षय बडवे
गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात गोडधोड, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात जास्तीचा नफा मिळवण्याच्या हेतूने भेसळयुक्त पदार्थ बाजारात विकणाऱ्यांचा सुळसुळाट असतो. असे भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाचा करडी नजर असते.
पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरु झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत म्हणून FDA ॲक्शन मोडमध्ये आला आहे. (Latest Marathi News)
शहरात विक्रीसाठी आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी होणार आहे. सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे शहरात समिती स्थापन करण्यात आली. (Pune News)
गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम राहणार सुरू आहे. नियम न पाळणाऱ्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे, अशी माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.