Koyana Dam Saam Tv
महाराष्ट्र

सातारा परिसरात पावसाची रिपरिप सुरुच; कोयना धरणात २.९ टीएमसीने वाढ

गेल्या २४ तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये जवळ २.९ टीएमसीने वाढ झाली आहे.

ओंकार राजेंद्र कदम

सातारा : गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस (Rain) कालपासून कमी झाला आहे. सातारा जिल्ह्यातही पाऊस कमी झाला आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दोन दिवसांपासून २.९ टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरण क्षेत्रात कालपासून पावसाचे कमी झाल्यामुळे धरणात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये जवळ २.९ टीएमसीने वाढ झाली आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणा पाणीसाठा - २५.२३ टीएमसी (२३.९७%) एवढा आहे. धरणात येणारे पाणी -२६७३६ क्युसेक एवढे आहे, तर कोयना - ७६ मिमी, नवजा - ८९ मिमी, महाबळेश्वर - १३५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

कोकणातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील काही भागांतील नागरिकांसाठी पुढील तीन दिवस महत्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे, ११ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६६ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्या इशारा पातळीपेक्षा खाली वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. (IMD warns heavy to heavy rainfall in Maharashtra Konkan Region for next 3 days Mumbai Raigad Ratnagiri Sindhudurg Thane Palghar)

ठाणे (Thane Rain) जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७६.४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही; तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबईत (Mumbai Rain) गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईमध्ये एनडीआरएफची एकूण ५ पथके तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT