इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार केला रद्द; ट्विटर कोर्टात जाणार

इलॉन मस्क यांना ट्विटर ४४ अब्ज डॉलर्संना विकत घ्यायचे होते.
Elon Musk
Elon MuskSaam Tv

सॅन फ्रान्सिस्को: गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेणार असल्याची बातमी समोर आली होती. आता या संदर्भात मोठी माहिती समोर आली होती. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला असल्याचे समोर आले आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांना ट्विटर (Twitter) ४४ अब्ज डॉलर्संना विकत घ्यायचे होते. पण त्यांनी हा करार रद्द केला आहे. हा करार रद्दला मस्क यांनी ट्विटरला जबाबदार धरले आहे.

बनावट अकाउंटबाबत माहिती देण्यात ट्विटर अपयशी ठरल्याचे मस्क यांनी सांगितले. ट्विटर विलीनीकरणाच्या अनेक अटींचा भंग केल्याचा आरोपही त्यांन केला आहे. मस्क (Elon Musk) यांच्या या घोषणेनंतर ट्विटरचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले.

Elon Musk
Amarnath Yatra 2022: जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; पाच जणांचा मृत्यू

१६ वर्ष जुनी असलेल्या ट्विटरला न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागू शकते, कंपनीच्या बोर्डाने विलीनीकरण कराराची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इलॉन मस्क यांच्याशी सहमती दर्शविल्याप्रमाणेच अटी आणि किंमतीवर हा करार करण्यास कंपनी बांधील आहे, असं ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो म्हणाले.

इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या वकिलांनी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, वारंवार विनंती करूनही, ट्विटर अयशस्वी झाले किंवा कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या बनावट किंवा स्पॅम अकाउंटबद्दल माहिती देण्यास नकार दिला. फाइलिंगमध्ये ट्विटरवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्विटरने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे ज्यावर मस्क यांनी विलीनीकरणाचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला, असंही या याचिकत म्हटले आहे.

Elon Musk
Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यन मृत्यू!

एप्रिलमध्ये इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. यानंतर ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यात बोलणी सुरू झाली होती. पण पुढे मस्क यांनी नंतर करार रद्द केला. हा करार रद्द करण्यासाठी इलॉन मस्क यांना मोठी रक्कम मोजावी लागू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com