श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरनाथच्या गुहेजवळ ढगफुटी झाल्याचं वृत्त आहे. या ढगफुटीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 'एनडीआरएफ' आणि 'एसडीआरएफ'च्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले आहे. ( Cloudburst Near Amarnath caves News In Marathi)
अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला आहे. या ढगफुटीने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. 'एनडीआरएफ'च्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. नदी पातळीच्या पुढे गेलेल्या लोकांवर पथकाचे लक्ष आहे. अमरनाथ येथे असलेल्या लोकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी करण्यात येणार आहे. तसेच अमरनाथ येथील भाविकांच्या नातेवाईकांसाठी या हेल्पलाइनचा वापर करता येऊ शकतो. या अमरनाथ यात्रेत आज शुक्रवारी ८-१० हजार लोक सामिल झाले होते.
'एनडीआरएफ'च्या अतुल गढवाल यांच्या माहितीनुसार, ढगफुटीची सूचना आम्हाला मिळाली आहे. आमचं एक पथक हे गुहेजवळ आहे. आम्ही अनेक पथक घटनास्थळी रवाना करत आहोत. घटनास्थळी किती जणांचा मृत्यू झाला आहे, याची अधिकृत माहिती देऊ शकत नाही. रेस्क्यू ऑपरेशन करताना पावसाचं मोठं नैसर्गिक आव्हान असणार आहे. तसेच भौगोलिक परिस्थिती आणि तेथील उंची देखील असेल. परंतु आमचे जवान हे प्रशिक्षित आहेत. त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करताना कोणतीही अडचण येणार नाही'.
पुढे म्हणाले, 'लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करून बचाव कार्य पार पाडू. आमच्यासोबत पैरामिलिट्रीचे जवान देखील असतील. तसेच तेथे हॅलीपॅड देखील असेल. जखमी लोकांना त्वरित उपचारांसाठी पाठवले जाईल. घटनास्थळाच्या वातावरणात जखमी लोकांना मदत करण्यासाठी स्थानिक जम्मू-काश्मीरचे पोलीस देखील असतील. तसेच बीएसएफ, सीआरपीचे मेडिकल टीम घटनास्थळी उपस्थित असेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.