Rain Update : पुढील ३ दिवस महत्वाचे; कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकणाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Rain Alert for Konkan Latest Update
Rain Alert for Konkan Latest UpdateSAAM TV

मुंबई : कोकणातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील काही भागांतील नागरिकांसाठी पुढील तीन दिवस महत्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे, ११ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६६ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्या इशारा पातळीपेक्षा खाली वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. (IMD warns heavy to heavy rainfall in Maharashtra Konkan Region for next 3 days Mumbai Raigad Ratnagiri Sindhudurg Thane Palghar)

Rain Alert for Konkan Latest Update
अकोल्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे (Thane Rain) जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७६.४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही; तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबईत (Mumbai Rain) गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईमध्ये एनडीआरएफची एकूण ५ पथके तैनात करण्यात आली आहेत.

रायगडमध्ये १९०० कुटुंबे स्थलांतरित

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७७.९ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही. तसेच कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १९६८ कुटुंबे म्हणजे एकूण ३६४९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच ५ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ पथके तैनात आहेत. (Raigad Rain Alert)

Rain Alert for Konkan Latest Update
Pune : ऐन पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी वणवण; ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा

रत्नागिरीत नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. सद्यस्थितीत पूरपरिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

दरड प्रवण व पूर प्रवण भागातील २८८ कुटुंबे म्हणजे एकूण ९६५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच ६ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन NDRF पथके तैनात करण्यात आली आहेत.

सिंधुदुर्गात एनडीआरएफ पथक तैनात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२७.० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. कुठेही पूरपरिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक NDRF पथक तैनात आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १९ मिमी पाऊस झाला असून, सद्यस्थितीमध्ये पूरपरिस्थिती नाही. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ३९.६ फूट असून इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे. पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये याआधीच तैनात केल्या आहेत.

राज्यातील पूरपरिस्थितीबाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये याआधीच १५ तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) - २, पालघर - १, रायगड - महाड - २, ठाणे - २ ,रत्नागिरी-चिपळूण - २, कोल्हापूर - २, सातारा- १, सिंधुदुर्ग- १ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड - १, गडचिरोली - १ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या

मुंबई - ३, पुणे- १, नागपूर- १ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे - २, नागपूर - २ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४ तुकड्या कायमस्वरूपी तैनात केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com