अकोल्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Heavy rainfall in akola
Heavy rainfall in akolasaam tv

प्रमोद जगताप

अकोला : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy rainfall) कोसळत असल्याने पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, ठाणे, पालघर, कोकणात शुक्रवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (India Meteorological Department) दिला आहे. राज्यात पावसाची संततधार सुरुच असल्याने नद्या नाल्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपल्याने मोठी पडझड झाली आहे. आयएमडीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून विजांच्या कडकडाटासह १०० मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच अकोला (Akola rain alert) जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Heavy rainfall in akola
मोठी बातमी ! मुंबईतील आमदार निवासात छत कोसळला, सुदैवाने शहाजीबापू पाटील बचावले

मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात मुसळधार पाऊस झाला. अकोला जिल्ह्याच्या विविध भागात अजूनही शेतीच्या पेरण्या रखडल्या आहे. मात्र, आज झालेल्या पावसामुळं बळीराजा सुखावला असून पेरण्यांच्या कामेही सुरु झाली आहेत. परंतु, ८ जुलैपर्यंत अकोला जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकरी वर्गालाही सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नदी, नाले, तलाव, धरणात नागरिकांनी पोहायला जावू नये, अशा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Heavy rainfall in akola
उल्हास नदीला पूर आला, मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात उतरला, अन्....

उल्हास नदी आणि काळू नदीचा प्रवाह वाढला

उल्हास नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे टिटवाळा परिसरातून वाहणाऱ्या काळू नदीचा प्रवाह सुद्धा वाढला आहे. या दोन्ही नद्यांचा प्रवाह वाढल्याने कल्याणमधील गांधारीच्या पात्रात सुद्धा पाणी वाढले आहे. उल्हास नदी आणि काळू नदी या दोन्ही नद्यांचा संगम कल्याणच्या गांधारी भागात होतो आणि पुढे हे पाणी कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com