Maharashtra Weather Updates IMD Rain Alert Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा! पुढील २ दिवसांत कुठे-कुठे कोसळणार मुसळधार?

Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Vishal Gangurde

Maharashtra rain update:

आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईसह नाशिकमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई दोन आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे, तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने नाशिककरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भाागत पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकंट आलं होतं. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पिके करपली. आज अनेक ठिकाणी पाऊस बरसला. त्यानंतर आता हवामान खात्याने पुढील ४८ तासांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबईऑरेंड अलर्ट तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याचबरोबर हवामान विभागाने मुंबईत ७, ८ आणि ९ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस तर 10 सप्टेंबरला वादळी वारे आणि गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत पाऊस राज्याच्या वायव्य भागात सक्रिय तर काही भागात अतिसक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वारे तीव्र आहे. ८ आणि ९ सप्टेंबर रोजी ढगांच्या गडगटांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकणातही पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुण्यात ढगाळ आकाश राहील, तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ सप्टेंबर संध्याकाळनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, कल्याण,डोंबिवली भागात मुसळधार पावासाची शक्यता आहे. आजही मुंबईत जोरदार पाऊस बरसला. मुसधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं.

या पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. दरम्यान, शासकीय यंत्रणेने मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तसेच स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असा संदेश पाठवला आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

नाशिकमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाने संपूर्ण नाशिक जिल्ह्याला झोडपलं. पावसामुळे गंगाभपूर धरणाच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT