Marathwada Rain  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भाला मुसळधार पावसाचा तडाखा ; बांध फुटले-जमिनी खरडल्या, गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Lalest Monoon Update: राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

साम टीव्ही, मुंबई

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने चांगला हाहाकार उडावल्याचं दिसतंय. हवामान विभागाने ७२ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नांदेड, लातून, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने दाणादाण केलीय. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती आल्याची माहिती मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पळालाय, कारण शेतपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येतंय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमधील सोना नदीला पूर (Maharashtra Rain) आला. काल दुपारपासूनच संततधार पाऊस या परिसरात सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील सगळ्याच भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातला या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होणार अशी शक्यता दिसते आहे.

मुसळधार पाऊस

सोलापूर शहर आणि परिसरात मागच्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आहे. काल सोलापुरात २१ मिमी पावसाची नोंद झालीय. सोलापुरात हवामान विभागाने काल येलो अलर्ट जारी केला होता. बार्शी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस (Rain Update) झालाय. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसांडून वाहू लागलाय. सलग दोन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती आणि निलकंठा नदीला पूर आलाय. नदीकाठाच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.

जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय. दरम्यान आष्टी ते सावरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना देखील सावरगाव येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळालाय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसला (Rain News) आहे. जिल्ह्यातील किनवट,माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. पुराचे पाणी शेती शिवारात शिरले आहे. शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

सर्वदूर पावसाची संततधार

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान पावसाळ्यातील चार महिन्याच्या सरासरीच्या जवळ हा दोन दिवसातील पाऊस झाला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. आज लातूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने जिल्ह्यातील (Latest Rain News) नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यात सातपुडा पर्वतरांगात देखील संततधार पाऊस सुरू आहे.

परभणीच्या सेलू शहरात देखील दमदार पावसाने हाहाकार माजवला. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना दमदार पाऊस आणि वीज पुरवठा खंडित अश्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. बीड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.परळी महामार्गावर असणारा तात्पुरता पूल वाहून गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT