Beed Rain : बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; ८ तासांपासून संततधार पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली

Beed news : बीड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे बीड, माजलगाव, वडवणी, परळी, केज, गेवराई, आष्टी यासह सर्वच तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
Beed Rain
Beed RainSaam tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या आठ तासांपासून मध्यम स्वरूपाचा संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने हाहाकार माजविला असून पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बाजारपेठा देखील ठप्प झाल्या आहेत. 

Beed Rain
Amalner News : मित्रा-मित्रांमध्ये पोहण्याची शर्यत लागली, तलावाच्या मध्यभागी गेला अन् दम लागला, एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू!

बीड (Beed) जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे बीड, माजलगाव, वडवणी, परळी, केज, गेवराई, आष्टी यासह सर्वच तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठ देखील ठप्प झाली आहे. या संततधार माध्यम स्वरूपाच्या पावसामुळे (Rain) अनेक रस्ते पाण्याखाली देखील केले आहेत. दरम्यान त्यामुळे आता जिल्ह्यातील नदी, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने बीडकरांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.

Beed Rain
Kalyan Crime : रेल्वेत जागेवर बसण्यावरून वाद, वृद्धाला केली मारहाण; पोलीस भरतीसाठी मुंबईला येणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

जिल्ह्यातील ३६ प्रकल्प ओव्हर फ्लो
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तर बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प १०० टक्के भरल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर जिल्ह्यातील १४३ मध्यम आणि लघु प्रकल्पापैकी ३६ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यामुळे प्रकल्पीय पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसाठा २१ टक्क्यावर गेला आहे. दरम्यान जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली तरच जिल्ह्यातील उर्वरित १०७ प्रकल्प भरतील.यामुळं बीड जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीप्रश्न नाहीसा होईल. त्यामुळे अद्यापही जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com