Kalyan Crime : रेल्वेत जागेवर बसण्यावरून वाद, वृद्धाला केली मारहाण; पोलीस भरतीसाठी मुंबईला येणारे तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : प्रवासादरम्यान जागेवर बसण्यावरून त्यांचा काही तरुणासोबत वाद झाला. नंतर कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: मेल एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान गोमांस असल्याच्या संशयावरून काही जणांनी एका वृद्धास मारहाण केल्याची घटना २८ ऑगस्टला घडली होती. या महाराणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी तीन जणांना अटक केली. विशेष म्हणजे हे तिघेजण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते. 

Kalyan Crime
Painganga River Flood : मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला; पैनगंगा नदीला पूर, माहूर जवळील पुलावरून पुराचे पाणी

धुळे- मुंबई एक्सप्रेसमध्ये मुंबईला येत असताना एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका वृद्ध इसमाजवळील प्लास्टिकच्या बरणीत गोमांस असल्याचा संशय आला. यातून त्या वृद्धाला काही जणांनी मारहाण (Kalyan) केल्याची घटना घडली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी (Railway Police) या घटनेची गंभीर दखल घेतली. तसेच या प्रकरणात रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या आदेशानंतर सदर पीडित व्यक्तीला पोलिसांनी शोधलं. हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव आहे. हाजी अशरफ अली हे मुळचे चाळीसगावचे राहणारे असून २८ ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते. 

Kalyan Crime
Amalner News : मित्रा-मित्रांमध्ये पोहण्याची शर्यत लागली, तलावाच्या मध्यभागी गेला अन् दम लागला, एकुलत्या एक मुलाचा बुडून मृत्यू!

प्रवासादरम्यान जागेवर बसण्यावरून त्यांचा काही तरुणासोबत वाद झाला. नंतर कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेन आल्यानंतर यांच्याकडे बीफ असल्याच्या संशयावरून तरुणांनी त्यांना मारहाण केली. अशरफ अली यांना कल्याण रेल्वे स्थानकात या तरुणांनी उतरू दिले नाही. नंतर त्यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले. मात्र रेल्वेतील काही प्रवाशांनी याचा व्हिडीओ करत तो व्हायरल केला होता. यावरून ठाणे जीआरपी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला. जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करत धुळे लोकल क्राईम ब्रांच पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तीन तरुणांना ताब्यात घेतले. नंतर या तरुणांना ठाणे जीआरपी पोलीस ठाण्यात आणले गेले. आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे आहेत. अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळे येथे राहणारे आहेत. त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com