Maharashtra Rain Alert Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: दहीहंडीला पावसाची सलामी, मुंबई-रायगडला रेड अलर्ट, IMD चा अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Rain Alert News: मुंबईत पावसाचा जोर वाढतच जात आहे. आज मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

Siddhi Hande

मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, आज दिवसभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामाना विभागाने, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज दिवसभर खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत रेड अलर्ट

आज मुंबई आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाण्यालादेखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जर काही काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच थांबा, असं आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेचं नागरिकांना आवाहन (BMC)

मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. जर गरज असेल तरच घराबाहेर पडा. याचसोबत जर काही गरज भासली किंवा मदत हवी असेल तर महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष १९१६ या नंबरवर संपर्क साधा.

मुंबईत पडत असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वेवर परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे त्यामुळे लोकल ट्रेन जवळपास अर्धा तास उशिराने सुरु आहे. याचसोबत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी कामाच्या वेळी नागरिकांचा खोळंबा होत आहे.

महाराष्ट्रात पावासाची जोरदार बॅटिंग (Maharashtra Rain Alert Today)

लातूर जिल्ह्यात सर्वत्र तुफान पाऊस बरसतोय, जिल्ह्यातल्या मांजरा ,रेणा,आणि तेरणा, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे,तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे देखील वाहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.

सोलापूरमध्ये जोरदार पाऊस (Solapur Rain Alert)

सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील कोरेगावात 50 हेक्टर शेती नदीच्या प्रवाहात वाहून गेले. बार्शी तालुक्यातील यमाई तलाव झाला ओव्हर फ्लो,त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्याने यमाई नदीचा प्रवाह वाढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Shocking : हृदयद्रावक! बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT