Maharashtra Politics saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: रायगडात एकनाथ शिंदेंना 'दे धक्का'; सुनिल तटकरेंची मोठी खेळी, सेनेचा नेता सोडणार साथ

Raigad Politics: भरत गोगावले यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीमध्ये सुनिल तटकरे यांनी सुरूंग लावलाय.

Bharat Jadhav

रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिदाचा वाद कायम असताना सुनिल तटकरेंनी मोठी खेळी खेळत रायगडात शिंदेंना मोठा धक्का दिलाय. माणगाव नगरपंचायतीमध्ये तटकरेंनी मोठा सुरूंग लावत शिंदेंना धक्का दिलाय. मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीमधील शिवसेनेचे नेते पक्षाची साथ सोडणार आहेत.

शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे हे माणगाव नगरपंचायतीच्या माजी नगरसेवकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत. येत्या २ ऑगस्ट रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

पैशाच्या आमिषामुळे साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश?

खासदार सुनील तटकरेंकडून पक्षप्रवेशासाठी पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. राजीव साबळे आणि माणगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकांना तटकरेंकडून पैशाचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं राजीव साबळे म्हणालेत.

सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या आरोपांना काही अर्थ नसल्याचं ते म्हणालेत. त्याचबरोबर आपण २ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती साबळे यांनी दिलीय. दरम्यान माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी देखील रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे आरोप फेटाळून लावलेत. कोणी कितीही वल्गना केल्या तरी आम्ही आमच्या नेत्यासोबत राहणार असल्याचं एकमत माणगाव नगरपंचायतमधील नगरसेवकांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Diwali CIDCO Lottery : दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर, जाणून घ्या कारण

Badlapur Local : बदलापूरमध्ये प्रचंड गोंधळ, सीएसएमटी लोकल तब्बल ४० मिनिटं उशिरा

Milk Tips: दुधासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

Maharashtra Maritime Board : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामगारांना दीपावली बोनस जाहीर | VIDEO

SCROLL FOR NEXT