Raigad Politics News Bharat Gogawale Aditi Tatkare  Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Raigad Politics: आदिती तटकरे-भरत गोगावले खुर्चीला खुर्ची लावून बसले, कानात कुजबुजले, पालकमंत्रिपदाचा वाद मिटला?

Bharat Gogawale Vs Aditi Tatkare : आलिबागमधील सरकारी कार्यक्रमावेळी आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोन्ही नेते एकत्र आले. समर्थक व स्थानिकांमध्ये “पालकमंत्रिपदाचा तोडगा लागणार का?” यावर चर्चा सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही याचा परिणाम दिसू शकतो.

Namdeo Kumbhar
  • रायगडमधील पालकमंत्रिपदावरून आदिती तटकरे व भरत गोगावले यांच्यात दीर्घकाळ वाद

  • अलिबागमध्ये एकाच व्यासपीठावर दोन्ही नेते एकत्र आले.

  • स्टेजवर एकमेकांच्या शेजारी बसून संवाद साधला.

  • कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांनी “रायगडच्या विकासासाठी आम्ही एकत्र राहू, राजकारण आणू नये” अशी भूमिका मांडल्याने वाद मिटण्याच्या चर्चेला उधाण आले.

Maharashtra Politics Latest News Update : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले एकाच आज व्यासपीठावर आले होते. रायगडमधील दोन्ही दिग्गज नेते खुर्चीला खुर्ची लावून बसल्याने पालकमंत्रिपदाचा वाद मिटला का? अशी चर्चा रायगडमध्ये सुरू झाली आहे. रायगडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तटकरे अन् गोगावले यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर गोगावले यांनी पालकमंत्री पद मिळावे, म्हणून साकडे घातले. पण फडणवीस सरकारमध्ये तटकरेंकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावर गोगावले अन् त्यांच्या समर्थकांनी उघड नाराजी दाखवली. समर्थक आक्रमक झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण अलिबागमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने हा वाद मिटल्याची चर्चा सुरू झाली.

राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आज व्‍यासपीठावर एकत्र पहायला मिळाले. अलिबागमध्‍ये मुख्‍यमंत्री समृद्ध राज अभियानाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उद्घाटन समारंभासाठी दोघेही एकत्र आले होते. महत्त्‍वाचं म्‍हणजे दोघांनीही एकमेकांच्‍या शेजारी बसत मनमोकळ्या गप्‍पा केल्‍याचं पहायला मिळालं. महायुतीचे सरकार राज्‍यात स्‍थापन झाल्‍यापासून दोघेही रायगडच्‍या पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत. आणि रायगडच्‍या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये वाद सुरू आहेत. मात्र आज दोघेही एकाच व्‍यासपीठावर एकत्र दिसले. "पालकमंत्रिपदाबाबत दोन्‍ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आम्‍ही दोघे रायगडच्‍या विकासासाठी एकत्र राहू असं आदिती तटकरे यांनी सांगितलं." तर आम्‍ही दोघं चांगल्‍या कामासाठी एकत्र आलो आहोत, यात कुणी राजकारण आणू नये अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचे घोंगडं भिजत असतानाच आदिती तटकरे अन् भरत गोगवले एकत्र आल्याने समर्थक संभ्रमात पडले आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोप करणारे दोन्ही नेते स्टेजवर खुर्चला खुर्ची लावून बसले होते. आलिबागमध्ये एका शासकीय कार्यक्रमाला दोघांचीनी उपस्थिती दर्शवली. रायगडच्या पालकमंत्री पदाचे दोन्ही दावेदार एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावली होती. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांमध्ये संवादही झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आदी दोन्ही नेत्यांमधील वाद मिटणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

होम लोन, कार लोन झालं स्वस्त; नवरात्रीआधी 'या' बँकेने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

iPhone 17 Series launch: खास डिझाइन, आकर्षक फिचर्स, iPhone 17 आज येतोय, किंमत किती असणार? VIDEO

Kajal Aggarwal : काजल अग्रवालच्या मृत्यूची अफवा, नेमकं काय आहे सत्य?

Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

SCROLL FOR NEXT