राज्य सरकारने गेल्या आठवड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू केला.
हैदराबाद गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेट समोर आले.
“कुणबी आणि मराठा एकच आहेत” असा गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे.
कोल्हापूर गॅझेट 1881 साली इंग्रजांनी तयार केले.
kolhapur gazette maratha kunbi reservation record : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आले. फडणवीस सरकारकडून तसा शासन आदेशही काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना फायदा होईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. हैदराबाद गॅझेटनुसार, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना १७ तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगेंनी केली. काही दिवसानंतर सातार गॅझेटही लागू होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅझेटचीही एन्ट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
सातारा गॅझिटिअरचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून महिनाभराचा वेळ मागवला आहे. ३० दिवसांत सातारा गॅझेटबाबत जीआर काढण्यात येणार आहे. त्याआधी मनोज जरांगे आणि मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वाचा असे कोल्हापूर गॅझेट समोर आलेय. अखिल भारतीय मराठा महासंघाकडून 'कोल्हापूर गॅझेट'चा समोर आणलेय. इंग्रजांनी १८८१ मध्ये कोल्हापूर गॅझेट तयार करण्यात होते. विशेष म्हणजे, कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यांच्यामध्ये रोटी-बेटीचे व्यवहार होत असल्याचाही उल्लेख आहे. या गॅझेटमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे.
कोल्हापूर गॅजेटमध्ये आहे तरी काय ?
१८८१ मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याची नोंद आहे. कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये रोटी-बेटीचे व्यवहार होतो, असाही उल्लेख आहे. गॅझेट तयार केले त्यावेळी कोल्हापूरची लोकसंख्या ८ लाख इतकी होती. त्यावेळी कोल्हापूरमध्ये ३ लाख कुणबी आणि ६० हजार मराठा होते. दरम्यान, २०११ मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या ३८ लाख इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.