महाराष्ट्र

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

Maharashtra Pothole Crisis: राज्यातील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली असून, पुणे, नाशिकसह विविध शहरांत वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. कोट्यवधींचा खर्च करूनही सुटका होत नसल्यानं, महाराष्ट्र खड्ड्यांतून रस्त्यांवर येणार तरी कधी? हा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.. पाहूयात याचसंदर्भातील सविस्तर रिपोर्ट

Rohit Kadam

राज्यातील विविध जिल्ह्यांतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. पुण्यासह नागपूरपर्यंत सर्वत्र रस्त्यांची चाळण झाली असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे, राज्यातील काही शहरांमध्ये सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याचा अंदाज येत नाहीये. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतायत. तसंच दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. एव्हंढच नाहीतर दुचाकींसह चारचाकी वाहनचालकांनाही रस्त्यांवरून जाताना मोठी कसरत करावी लागत असून शहरांतील रस्ते वाहतूकही संथ गतीनं सुरू आहे.

पुणे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचे अनेक दाखले समोर आले आहेत. त्यात आता रस्त्यांवरील खड्ड्यांची भर पडलीये. महापालिकेच्या पथ विभागानं शहरात केवळ 54 खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला. मात्र, सजग नागरिक मंचाने अवघ्या 50 मीटरच्या पट्ट्यात 25 खड्डे दाखवून पालिकेच्या दाव्याची पोलखोल केलीये.

तर नाशिक शहर परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढलंय. कुंभमेळ्यासाठी चाललेल्या खोदकामांनी सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून त्यात चिखलाची भर पडलीये. महत्त्वाचं म्हणजे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे श्वास घ्यायला त्रास झाला, रूग्णालयात ऍडमिट करावं लागलंय.

नाशिकनंतर कोल्हापुरातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. कोल्हापुरात ठिकठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीये. त्यामुळे पावसाळा संपण्याची वाट न पाहता रस्त्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी आता वाहनधारकांकडून होतेय. सांगली जिल्ह्यातील शहरांमधील रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडले आहेत. त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवासही करावा लागतोय. संबंधित विभागाकडून अद्यापही लक्ष देण्यात येत नसल्यानं वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार आहेत. मात्र, महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या प्रवासात विघ्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जागोजागी खड्डे पडून महामार्गाची पार दुरावस्था झालीये. खरंतर, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. एव्हंढच नाहीतर न्यायालयं या खड्ड्यांवरून शासनाची खरडपट्टीही काढतं.

मात्र, राज्यातील नागरिकांची रस्त्यांवरील खड्ड्यांपासून सुटका काही होत नाहीये. दरवर्षी सरकारकडून कोट्यवधी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च केले जातात... मात्र, इतके कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर खड्डेमुक्त रस्ते मिळणार नसतील तर मग महाराष्ट्र खड्ड्यांतून रस्त्यांवर नेमका येणार तरी कधी? असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT