अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल, मुंबईतील विनापरवानगी आंदोलन भोवले; पाहा अपडेट

मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलन झाले. याप्रकरणी अभिजीत दिपके यांच्यासह CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

CJP Shivaji Park protest police complaint : मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात विनापरवानगी आंदोलन करणे CJP ला महागात पडले आहे. पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी शिवाजी पार्क आणि दादर पोलिसांनी कडक कारवाई करत CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, CJP संघटनेतर्फे दादर आणि शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनासाठी पोलिसांकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. विनापरवानगी लोक एकत्र आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला.

CJP Shivaji Park protest police complaint

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com