Electricity consumption: घरातील सर्वात जास्त वीज कोणत्या गॅजेटला लागते?

Surabhi Jayashree Jagdish

एअर कंडिशनर

एअर कंडिशनर हे घरातील जास्त वीज वापरणाऱ्या उपकरणांपैकी एक आहे. AC किती वीज वापरतो हे त्याची क्षमता, तापमानाची सेटिंग आणि तो किती वेळ चालतो यावर अवलंबून असतं. दररोज अनेक तास AC वापरल्यास महिन्याच्या वीज बिलात त्याचा मोठा वाटा पडू शकतो.

गीझर

गीझर पाणी गरम करण्यासाठी जास्त वीज वापरू शकतो. जितका जास्त वेळ सुरू ठेवला जातो, तितकी त्याची वीज खपत वाढते. गरज नसताना गीझर बराच वेळ सुरू ठेवल्यास वीज बिल वाढू शकते.

इलेक्ट्रिक हीटर आणि रूम हीटर

इलेक्ट्रिक हीटर आणि रूम हीटर यांची पॉवर क्षमता बऱ्यापैकी जास्त असू शकते. त्यामुळे कमी वेळ वापरला तरी ते तुलनेने जास्त वीज वापरू शकतात. हीटर किती वॅटचा आहे आणि तो दिवसातून किती वेळ चालतो यावर एकूण खपत ठरते.

रेफ्रिजरेटर

फ्रिजचं प्लग दिवसभर ऑन असल्यामुळे त्याचा नियमित वीज वापर होतो. मात्र फ्रिजचा कंप्रेसर सतत पूर्ण क्षमतेने चालत नसतो आणि गरजेनुसार तो सुरू-बंद होत राहतो. त्यामुळे महिन्याच्या एकूण वीज वापरामध्ये फ्रिजचाही वाटा असतो.

वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह

वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह साधारणपणे कमी वेळ वापरले जातात. मात्र त्यांची वॅट क्षमता अनेक छोट्या घरगुती उपकरणांपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे कमी वेळ वापरले तरी त्या काळात ते तुलनेने जास्त वीज वापरू शकतात.

उपकरणाची वॅट क्षमता

एखाद्या उपकरणाची वीज खपत समजण्यासाठी त्याची वॅट क्षमता पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत ते उपकरण दररोज किती तास चालते, हेही पाहावे लागते.

वापरात नसलेली उपकरणं बंद करा

काम नसताना इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद ठेवल्यास अनावश्यक वीज वापर कमी करण्यास मदत होते.

सतत सुरू ठेवण्याची गरज नसलेली उपकरणं वापरानंतर बंद करणं चांगली सवय आहे.

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

liver tumor symptoms
येथे क्लिक करा