Deputy Chief Minister Eknath Shinde  Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Deputy Chief Minister Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याबाबत मंत्री दादा भुसे यांनी मोठं विधान केले आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप-शिवसेना अंतर्गत वादादरम्यान त्यांनी हे विधान केले.

Priya More

Summary -

  • एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

  • दादा भुसे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

  • महायुतीमध्ये भाजप–शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे

  • दादा भुसेंनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक मतभेद असल्याचे वारंवार दिसून येत आहे. महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील वाद हा फक्त राज्यापुरता मर्यादीत राहिला नसून तो आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील तणावाचे वातावरण वाढतच चालले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. अशातच राज्य सरकारमधील शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी मोठं विधान केले आहे.

दादा भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या हृदयात राहणारे मुख्यमंत्री आहेत आणि जनता त्यांना पुन्हा राज्याचे नेतृत्व करताना पाहतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या् निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या नेत्यांना पक्षात आणण्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशामध्ये दादा भुसे यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

नंदुरबार येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित सभेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी यावेळी सांगितले की, 'आजही जर तुम्ही लोकांना विचारले की त्यांच्या हृदयात कोणता मुख्यमंत्री आहे तर ते म्हणतील की एकनाथ शिंदे. पण काळजी करू नका. नशिबाने सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना आपण पाहू.'

यावेळी दादा भुसे यांनी असा दावा केला की, 'एकनाथ शिंदे हे असे मुख्यमंत्री होते जे रात्री उशिरापर्यंत सर्वांना भेटायचे आणि दिवसाचे २०-२२ तास काम करायचे. महाराष्ट्राने एकनाथ शिंदेंसारखा दुर्मिळ मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही.' तर एकनाथ शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे म्हटले की, 'राज्याने कधीही असा मुख्यमंत्री पाहिला नाही ज्यांनी इतक्या महत्त्वाच्या मंजुरी दिल्या आहेत.'

दरम्यान, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेच्या एका आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, २०२२ च्या पक्षफुटीच्या वेळी उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी आमदाराने पैसे स्वीकारले होते. त्यांनी आरोप केला की, २०२२ मध्ये कळमनुरी मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पक्ष बदलण्यासाठी ५० कोटी रुपये घेतले होते. त्यांच्या या दाव्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

Bads of Bollywood: समीर वानखेडे यांच्या याचिकेला नेटफ्लिक्सचा विरोध; 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' विरोधात केला होता उच्च न्यायालयात अर्ज

Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

SCROLL FOR NEXT