Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?

Badalapur Politics: बदलापुरमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडू करण्यात आला आहे. काही महिलांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले.
Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • बदलापुरात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मतदारांना पैसे वाटताना शिंदेसेनेने रंगेहाथ पकडले

  • यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा राडा

  • या घटनेमुळे महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला

  • पाकिटांमध्ये प्रत्येकी ३,००० रुपये असल्याची माहिती समोर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. बदलापुरमधील महायुतीमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगेहात पकडण्यात आले. बदलापुरच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले.

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?
Maharashtra Politics: एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादामुळे माझं सँडविच होतं, रक्षा खडसे असं का म्हणाल्या?

बदलापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केला आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याकडून पैशानं भरलेली पाकीटं वाटत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं. त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही पाहायला मिळाला.

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

बदलापुरच्या प्रभाग क्रमांक १ मधील शांतीनगर भागात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता पैशाने भरलेली पाकीट मतदारांना वाटत असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पैशांची पाकिटं वाटमाऱ्या या महिलांना रंगेहात पकडत त्यांना जाब विचारला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली. या पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?
Maharashtra Politics: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची धावत्या ट्रेनसमोर आत्महत्या; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याची माहिती

दरम्यान, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर काल निलेश राणे यांनी छापा टाकला होता. छाप्यात २५ लाखांची रक्कम सापडली होती. नितेश राणे विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली होती. नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, 'आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो. तो नियम सगळ्यांना लागणार.'

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?
Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com