Ajit Pawar Plane Crash Saam tv
महाराष्ट्र

NCP Party: अध्यक्षांचे निधन झाल्यास पक्षाची सूत्रे कुणाकडे? अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत काय होणार?

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या निधनामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षांचे निधन झाल्यास पक्षाची सूत्रे कुणाकडे जातात हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन

  • २८ जानेवारीला बारामतीमध्ये त्यांचे विमान कोसळले

  • या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला

  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले

गिरीश कांबळे, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) अध्यक्षपद रिक्त झाल्यास किंवा अध्यक्षांचे अकाली निधन झाल्यास पक्षाची पुढील वाटचाल कशी ठरते, याबाबत पक्षघटनेत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. NCP च्या घटनेतील कलम 20 नुसार अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्णतः लोकशाही आणि निवडणूक-केंद्रित आहे.

अध्यक्षांचे निधन किंवा राजीनामा झाल्यास काय?

हा मुद्दा पक्षघटनेतील कलम 20 (viii) मध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.

अध्यक्षांचे निधन, राजीनामा किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास:

- पक्षातील सर्वात वरिष्ठ General Secretary (वरिष्ठ महासचिव)

- तात्पुरत्या स्वरूपात अध्यक्षीय कामकाज पाहतो.

- तो Interim President म्हणून जबाबदारी सांभाळतो.

नवीन अध्यक्ष कसा निवडला जातो?

- पक्षाची कार्यकारिणी (Working Committee) तात्पुरता अध्यक्ष (Provisional President) नेमू शकते.

-मात्र, नियमित अध्यक्षाची निवड ही National Committee मार्फत पुन्हा निवडणुकीनेच करावी लागते.

अध्यक्षाची निवड कशी होते?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षाची नियुक्ती न करता थेट निवडणुकीद्वारे निवड केली जाते. ही निवडणूक केंद्रीय निवडणूक प्राधिकरण (Central Election Authority) मार्फत पार पडते. या प्राधिकरणाचा अध्यक्ष हा पदसिद्ध (Ex-officio) Returning Officer (निवडणूक अधिकारी) असतो.

अध्यक्षपदासाठी उमेदवारी कोण देऊ शकतो?

पक्षघटनेनुसार,

- कोणतेही 10 अधिकृत प्रतिनिधी (Delegates)

- संयुक्तपणे एका प्रतिनिधीचे नाव

- अध्यक्षपदासाठी सुचवू शकतात.

अध्यक्ष निवडणुकीत मतदान कोण करतो?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त:

-राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधींनाच (Delegates) असतो.

सामान्य कार्यकर्ता, आमदार किंवा खासदार यांना थेट मतदानाचा अधिकार नसतो. फक्त संविधानानुसार निवडून आलेले प्रतिनिधीच मतदान करतात.

Delegates म्हणजे कोण?

राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधी म्हणजेच राज्य समिती (State Committee) सदस्य.

राज्य समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश असतो -

- मतदारसंघ / ब्लॉक समित्यांतून मतदारसंख्येनुसार निवडून आलेले प्रतिनिधी

- किमान 365 दिवस कार्यकाळ पूर्ण केलेले माजी राज्याध्यक्ष (सक्रीय सदस्य असणे आवश्यक)

- संबंधित राज्यातील सर्व जिल्हा समिती अध्यक्ष

- त्या राज्यात राहणारे राष्ट्रीय Working Committee (WC) सदस्य

- NCP विधिमंडळ पक्षातून निवडलेले 5% सदस्य (कमाल 15)

- विशेष घटकांचे प्रतिनिधित्व करणारे सहनियुक्त (Co-opted) सदस्य (या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो)

मतदान पद्धत काय?

- एकच उमेदवार असल्यास तो उमेदवार बिनविरोध अध्यक्ष घोषित होतो.

- दोन किंवा अधिक उमेदवार असल्यास:

- गुप्त मतदान (Secret Ballot) घेतले जाते.

- दोन उमेदवार असतील तर प्रत्येकी एक मत

- दोनपेक्षा अधिक उमेदवार असतील तर प्राधान्यक्रम मतदान पद्धत (1, 2, 3…)

- 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवणारा उमेदवार अध्यक्ष ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यपालांचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

दर्शनासाठी ‘VIP स्कीम’चा सापळा; त्र्यंबकेश्वरमध्ये दलालांचा धुमाकूळ|VIDEO

IND vs ENG T20 WC Semi Final: पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; संजू सॅमसनची फटकेबाजी, २६ चेंडूत ठोकलं अर्धशतक

गोविंदगिरी महाराज चुकले, आम्ही त्यांच्या विचारांचे खंडन करतो; हभप उद्धव महाराज मंडलिक असे का म्हणाले?

Forever Design Mangalsutra: फंक्शन ते डेली वेअरसाठी ट्राय करा ट्रेंडी लेटेस्ट हे ७ फॉरेव्हर मंगळसूत्र डिझाईन्स

SCROLL FOR NEXT