दर्शनासाठी ‘VIP स्कीम’चा सापळा; त्र्यंबकेश्वरमध्ये दलालांचा धुमाकूळ|VIDEO

Trimbakeshwar Temple Darshan Scam Nashik: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दलालांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची लूट होत असल्याचा आरोप होतोय. मंदिराभोवती फिरणारे दलाल श्रीमंत भाविकांच्या शोधात असतात. परराज्यातील भाविकांना ते अचूकपणे हेरतात. त्यांना फक्त मंदिरापर्यंत पोहोचविण्याचे दोनशे रुपये घेतले जातात. पास काढून दर्शनासाठी पाठविण्याचे प्रतिव्यक्ती ४०० ते ४५० रुपये घेण्याचा हा एक प्रकारे व्यवसाय बनलाय. महत्त्वाचं म्हणजे १० मिनिटांत दर्शन घ्यायचे असल्यास तीन हजार रुपयांपर्यंत भाव वाढतात. अनेक भाविक या दर्शन स्कीमला बळी पडत असल्य़ाचं समोर आलंय. .त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाच्या लुटीचा हा मुद्दा नाशिक सकाळने लावून धरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com