

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला अभिषेक शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला.मात्र सलामीसाठी आलेल्या संजू सॅमसननं धमाकेदार फटकेबाजी करत सलग दुसरं अर्धशतक केलं. त्याने अवघ्या २६ चेंडूत ५० धावा केल्या. भारताने पवार प्लेमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये भारताने ६७ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने पहिले षटक टाकले. भारताने ८.३ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या.
या षटकात संजू सॅमसनने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारला. तर अभिषेकने शेवटच्या चेंडूवर आपले खाते उघडले. अशाप्रकारे भारतीय फंलदाजांनी १२ धावा मिळवल्या. दुसऱ्या षटकात अभिषेकने विल जॅक्सच्या चेंडूवर दोन चौकार मारले. दरम्यान शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना अभिषेक झेलबाद झाला. तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर संजू सॅमसनने १४ धावा दिल्या. चौथ्या षटकात विल जॅक्सने ११ धावा दिल्या. पाचव्या षटकात ओव्हरटनने १० धावा दिल्या. सहाव्या षटकात सॅम करनने १२ धावा दिल्या आणि तो महागडा ठरला.
दरम्यान भारतीय संघाला मोठ्या धावसंख्खेचे आव्हान ठेवावे लागेल. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वानखेडे स्टेडियमवर २००+ धावांचे लक्ष्य गाठणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे. २०१६ मध्ये याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने २३० धावांचे लक्ष्य गाठले होते. म्हणजेच काय टीम इंडियाने २३० धावा केल्या तरी विजयाची खात्री नाही. जोस बटलर आणि फिल सॉल्ट हे आतापर्यंत अपयशी ठरले असले तरी इंग्लंड संघात २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पुरेसे सामर्थ्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.