Mahadeo Jankar Warns Mahayuti Over Seat Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महादेव जानकरांनी वाढवलं महायुतीचं टेन्शन, २८८ जागा लढवण्याचा इशारा

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटापाच्या जोरदार बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांना देखील जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहेत. अशामध्ये रासपचे नेते महादेव जानकर यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीला इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रासपचे नेते महादेव जानकर यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना महायुतीला इशारा दिला. सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास २८८ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रासपची महायुतीकडे ३५ ते ४० जागांची मागणी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यातच अजून जागा वाटप होत नसल्याने आमच्याशी चर्चेचा विषय नाही, असा टोला यावेळी महादेव जानकर यांनी लागावला आहे. महायुतीतचं मात्र सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी जानकरांनी दर्शवली आहे.

महादेव जानकर यांनी सांगितले की, 'संविधानिक पदाने कुठल्याही व्यक्तीने जिम्मेदारपणाने चालले पाहिजे. मी माजी मंत्री होतो. आम्ही देखील संयमाने आणि घटनेच्या तरतुदीने चालले पाहिजे. ते देखील तसे चालतील. काही प्रॉब्लेम होणार नाही. भांडण वैगरे काहीच होणार नाही. संयमाने मार्ग सुटतील. जागावाटपाच्या चर्चेसाठी अजून आम्हाला बोलावलेले नाही. त्यामुळे आमची तयारी चालू आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांचेच चालले आहे. त्या तिघांचेच मिटत नाहीये. त्यामुळे आम्हाला बोलावले नाही. आम्ही आमची तयारी चालू केली आहे. '

तसंच, 'आम्ही आता युतीसोबत आहोत. युतीने जर आम्हाला सन्मानाने जागा नाही दिली तर आम्ही २८८ ची तयारी केली आहे. आमची जिथे जिथे ताकद आहे त्या जागा आम्हाला दिल्या पाहिजे. आमची मागणी आहे की ३५ ते ४० जागा महायुतीने रासपला सोडाव्यात अशी आमची इच्छा आहे. मी माझ्या पक्षासाठी कमिटेड आहे. महाविकास आघाडीने संपर्क केला नाही. आमची महायुतीसोबत युती असल्यामुळे महाविकास आघाडी आम्हाला काही विचारणार नाही. महाविकास आघाडी सध्या हवेत आहे. आम्ही कोणावर अवलंबून नाही. मी माझ्या पायाने खंबीर आहे. मी माझ्या ताकदीने १० ते १२ आमदार निवडून आणू शकतो यावर मला विश्वास आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुंबईतील धार्मिक स्थळांना धमकी देणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

MU Senate Election : मुंबईचा किंग कोण? सिनेट निवडणूकीत ठाकरेंचा डंका; महायुतीच्या मुंबईतल्या आमदारांचं टेंशन वाढलं?

Maharashtra Politics : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावं, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कुणी केली मागणी?

Whale Fish Vomit : व्हेल माशाच्या कोट्यावधी रुपयांच्या उलटीची तस्करी, पोलिसांनी सापळा रचत तिघांना ठोकल्या बेड्या

Maharashtra Election : आगामी निवडणुकीत राखीव मतदारसंघ आणि महिला मतदारसंघाची संख्या किती? आयोगाने दिली महत्वाची माहिती, वाचा

SCROLL FOR NEXT