Maharashtra Politics Vanchit Bahujan Aaghadi Letter To Mahavikas aaghadi on Lokabha Election Seat Sharing  Saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: टाकाऊ नको; जिंकणाऱ्याचं जागा द्या... 'वंचित'चे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Maharashtra Politics Breaking News: वंचित बहुजन आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Vanchit Aaghadi Letter To Mahavikas Aaghadi:

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते वंचितला घेण्याबाबत आग्रही असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वारंवार डावलले जात असल्याचा दावा वंचितकडून केला जात आहे. अशातच आता वंचित आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा रेखा ठाकूर यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहत जागा वाटपासंदर्भात महत्वाची मागणी केली आहे.

काय आहे पत्र?

भाजप-आरएसएसच्या (BJP- RSS) विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत. ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडी बद्दल आम्ही सकारात्मक आहोत, असे या पत्रामध्ये म्हटले आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीला (Vanchit bahujan Aaghadi) सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. आणि कॉग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजपमध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे, असा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आम्ही महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) आदरच करतो, पण सातत्याने चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिके मुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत परंतू वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नको अशी ही भूमिका आहे. आपण ठरवून आपापसात चर्चा करावी व ९ फेब्रुवारीच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी, असे या पत्रामध्ये म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT