Kolhapur Politics : कोल्हापुरात राजकारण तापलं; CM एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे

Kolhapur Political News : कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSaam tv
Published On

रणजीत मांजगावकर, कोल्हापूर

Eknath Shinde Latest News :

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आहेत. ऊसाचा दुसरा हप्ता १०० रुपये द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडगाव हातकंणगले रोडवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी ऊसाचा दुसऱ्या हप्त्याचा मुद्दा लावून धरला आहे. राज्य सरकारने दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० रूपयांचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मध्यस्थी केली होती. यानंतर पुणे बेंगळुरू महामार्गावर आंदोलन स्थगित केले होते. कोल्हापुरातील ९ साखर कारखान्यांनी १०० रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur Politics
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या गडकरींना दिलेल्या ऑफरची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, 'ठाकरेंची ऑफर म्हणजे गल्लीतील नेत्यानं...'

राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निषेधार्थ डिजिटल बोर्ड तयार केला होता. या बोर्डावर अनेक वेगळ्या घोषणा लिहिल्या होत्या.

Kolhapur Politics
Supriya Sule: निवडणुका आल्‍या की 'जुमले' पाहायला मिळतात; PM मोदींच्या 'त्या' घोषणेवरून सुप्रिया सुळेंचा टोला

या बोर्डावर १०० रुपयांचा दुसरा हप्ता बुडवून, एफआरपीचे (FRP) तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही, दगड घ्यायला लावणारे सरकार, मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका, ठरल्याप्रमाणे मागील हंगामातील दुसरा हप्ता १०० रूपये तातडीने द्या, अशा आशयाचे फलक दाखवण्यात आले आहेत.

नारायण राणेंना काळे झेंडे दाखवण्याआधी मराठा समाजाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. नारायण राणे यांच्या दौऱ्याआधी काळे झेंडे दाखवण्यासाठी आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्री राणे आज एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत.

राणे यांच्या दौऱ्याआधी त्यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावे, या मागणीवरून मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध म्हणून मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायण राणेंना काळे झेंडे दाखवणार होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com